असुविधांच्या विरोधात कार्यशाळेचे आयोजन | Conducting karyshala against inconveniences
असुविधांच्या विरोधात कार्यशाळेचे आयोजन | Conducting karyshala against inconveniences
शासनाची पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्याला कामाला लावा संविधान रक्षक कृती समितीचे अध्यक्ष शंकर पवार यांचे आव्हान.
मुखेड तालुक्यातील मौजे मांजरी येथे संविधान रक्षक संघर्ष समितीच्या वतीने असुविधांच्या विरोधात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये निराधार, अपंग, शेतकरी, कष्टकरी, मजूर कामगार, भूमिहीन, बेरोजगार, युवक युती, अशा विविध ज्वलंत प्रश्नासाठी व तालुक्यातील भ्रष्टाचार अधिकारी व कर्मचाऱ्यांची बेजबाबदारपणा व विविध होणाऱ्या गैरवर्तनाच्या असुविधीच्या विरोधात जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी संविधान रक्षक संघर्ष समितीच्या वतीने ही कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळा घेण्या मागचा उद्देश असा आहे की जनसामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत त्यांचा वेळ आणि पैसा वाचला पाहिजे तसेच तलाठी, आणि ग्रामसेवक, ठरल्याप्रमाणे सज्जावर हजर राहुन लोकांची काम केली पाहिजे. हा कार्यशाळेचा मुख्य हेतू होता.
तसेच मुखेड तालुक्यातील काही गावचा अंतर लांब असल्यामुळे जन सामान्य लोकांना ये जा करण्यासाठी परवडत नाही जर एखादा व्यक्ती आपल्या कामा निमित्य तालुक्याला गेला तर त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित राहत नाही अशा अनेक बारा भानगडी त्यांच्यासमोर येत असतात. त्यासाठी प्रशासन याबाबत सविस्तर असं विचार करून गोरगरिबाचे प्रश्न सुटतील अशी सूचना अधिकाऱ्याला द्यावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन केलं होत.
तसेच संविधान रक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकर पवार पुढे म्हणाले की आपले अधिकार काय आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे एखादा कर्मचारी काम करत नसेल तर त्याची तक्रार आमच्याकडे करा असेही ते कार्यशाळेच्या माध्यमातून सांगितले.
या कार्यशाळेला गावातील लोकांचा चांगला असा प्रतिसाद लाभला असून या कार्यशाळेच आयोजन माजी सरपंच अशोक वाघमारे यांनी केल. तर कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे, काँग्रेसचे श्रावण रँपनवाड, नामदेव गवलवाड सह आदींची उपस्थिती होती.
prashan pavitre- मुखेड/नांदेड
COMMENTS