श्रावण मासानिमित्त डॉ. रेखाताई चव्हाण यांच्याकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन | On the occasion of Shravan month, Organized various programs b...
श्रावण मासानिमित्त डॉ. रेखाताई चव्हाण यांच्याकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन | On the occasion of Shravan month, Organized various programs by Dr. Rekha Tai Chavan
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११:०० वाजता श्री केदारनाथ संस्थान, केदारगुडा येथे केदारनाथ संस्थान चे महंत श्री मृत्युंजय भारती यांच्या कृपाशीर्वादाने डॉक्टर सौ. रेखाताई चव्हाण यांच्याकडून भगवान श्री केदारनाथाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसाद कार्यक्रमाला हजर राहून सर्व भाविक - भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सौ रेखाताई चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे.
तसेच दि ०५ ऑगस्ट वार सोमवार रोजी श्री केदारनाथ संस्थान केदारगुडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेवून स्वछेने रक्तदान करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
तसेच नागपंचमी निमित्त शिराळ ऑनलाईन स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या स्पर्धकास प्रथम पारितोषिक (२१०००) एकवीस हजार रुपये , द्वितीय येणाऱ्या स्पर्धकास द्वितीय पारितोषिक (११०००) अकरा हजार रुपये व तृतीय येणाऱ्या स्पर्धकास तृतीय पारितोषिक (७०००) सात हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ ११११ रुपये बक्षीस कमिटी तर्फे ठेवण्यात आले आहे. सर्धेची रूपरेषा व निकष खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत.
स्पर्धा ही ऑनलाइन स्वरूपाची असेल.
2. सजावट व्हीडिओ दिलेल्या वॉट्सॲप नंबर वर पाठवावे.
3. व्हिडीओ हे आडवे (Landscape mode) आणि एक सलग (Without cut) असावेत.
4. व्हिडीओ कमीत कमी २ ते जास्तीत जास्तं ५ मिनिटांचा असावा.
5. एका स्पर्धकाला केवळ एक व्हिडिओ पाठवता येईल.
6. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट रोजी भव्य वादविवाद स्पर्धेचे सुद्धा आयोजन डॉ सौ रेखाताई चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींचे कार्य काय आणि ते काय करतात ??
- महिलांचे प्रश्न सुटलेत का नाही ?
- सरकारी योजनांची अंमलबजावणी होते का नाही ?
- जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सुखी आहे का नाही ?
- शिक्षणाचे बाजारीकरण झाले का नाही ? या वादविवाद स्पर्धेमध्ये स्पर्धकांना या विषयांवर भाष्य करावे लागणार आहे.
वादविवाद स्पर्धा ही सर्वांसाठी खुली असेल. वादविवाद स्पर्धा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. दिलेल्या विषयावर बोलण्यासाठी स्पर्धकांना पाच ते सात मिनिटांचा वेळ दिला जाईल.
स्पर्धेत बोलले जाणारे मुद्दे आक्षेपार्ह नसावेत आदी नियम कमिटी तर्फे ठेवण्यात आलेले आहेत.
वाढदिवस स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या स्पर्धकास ११ हजार रुपये, द्वितीय येणाऱ्या स्पर्धकास ७ हजार रुपये व तृतीय येणाऱ्या स्पर्धाकास ५ हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ ११११ रुपये असे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी त्यांच्याकडून पुढील क्रमांक जाहीर करण्यात आलेले आहेत. ७६२०३७५१२३, ९६७३९३११०७
अशी माहिती डॉ सौ रेखाताई चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष, नांदेड जिल्हा महिला काँग्रेस, यांनी पुढाकार समाचार शी बोलताना दिली.
COMMENTS